मोठी ब्रेकिंग! अमरावतीच्या तिवस्यात सापडला स्फोटकांचा मोठा साठा; तब्बल 200 जिलेटिनच्या कांड्या जप्त 

अचानक रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली.
अचानक रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली.

तिवसा (जि. अमरावती) ः तिवसा येथील पंचवटी चौकात 200 जिलेटिन व डिटोनेटर अशी स्फोटके फेकून पसार झालेल्या व्यक्तीस स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आज पकडले.

अचानक रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सुमीत अनिल सोनोने (रा. सातरगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने ही स्फोटके करजगाव (लोणी) येथील अंकुश लांडगे याला विकल्याची कबुली दिली. पोलिस मार्गावर असल्याचे कळताच अंकुश पसार झाला. 

गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सुमीत याला तिवसा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सुमीतला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, उपनिरीक्षक विजय गरड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, सुनील केवतकर, बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, राहुल सोलव, सरिता चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही स्फोटके सुमीतने नेमकी आणली कोठून यासंदर्भात त्याने ठोस माहिती दिली नव्हती. खाण किंवा विहिरींसाठी ही स्फोटके वापरण्यात येत असल्याची माहिती आहे.

मुंबईच्या पार्श्‍वभूमीवर खळबळ

मुंबईत आढळून आलेल्या स्फोटकांच्या साठ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या पार्श्‍वभूमिवर तिवस्यात आज आढळून आलेल्या जिलेटिनच्या कांड्या तसेच डिटोनेटरने चांगलीच खळबळ उडवून दिली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा विहिरीत ब्लास्टिंग करण्याचा व्यवसाय आहे. त्याने ही स्फोटके बाहेरून विकत आणली. अन्‌ दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्याच्याकडे अधिकृत परवाना नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
- तपन कोल्हे, 
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हेशाखा, अमरावती.

वाहतुक कर्मचारी ड्युटीवर असताना दुचारीने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. एका दुचाकीवरून दोन युवक पोत्यात दारू घेऊन जात असल्याच्या संशयावरून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न पोलिस कर्मचाऱ्याने केला. मात्र त्यांनी जवळ असलेला मुद्देमाल टाकून पळ काढला. त्या वस्तूची पाहणी केली असता त्यात स्फोटके आढळली. त्यावरून एकाला अटक करण्यात आली आहे, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
- रिता उईके, 
पोलिस निरीक्षक, तिवसा.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com