अमरावती : अमृतमहोत्सवानिमित्त एक खटला मोफत

जुळ्या शहरात वकील संघाचा लोकाभिमुख निर्णय
Lawyers Association One case free on the occasion of Amritmahotsava amravati
Lawyers Association One case free on the occasion of Amritmahotsava amravatiesakal

अमरावती : अचलपूर वकील संघाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक खटला मोफत लढविण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. मोफत खटला लढवण्याचा निर्णय घेणारा कदाचित राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचा अचलपूर वकील संघ हा एकमेव ठरण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा मुख्यालयानंतर अचलपूर तालुका व जुळे शहर हे लोकसंख्येच्या मानाने मोठे शहर असून येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे. तेथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे खटले चालवले जातात. लोकसंख्येप्रमाणे आजूबाजूच्या तालुक्यात न्यायालयीन प्रकरणे दिवसागणिक वाढत आहेत. गोरगरिबांना खटला चालवणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले असतानाच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अचलपूर वकील संघाच्या वतीने एक खटला मोफत चालवण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह व क्रांतिकारक असल्याचे बोलले जात आहे.

अचलपूर येथील न्यायालयात वकिली करणारे जवळपास अडीचशे वकील आहेत. त्यामुळे अडीचशे गोरगरिबांना याचा फायदा मिळू शकेल, असा आशावाद अचलपूर वकील संघाने व्यक्त केला आहे. एक खटला मोफत हा उपक्रम इतर न्यायालयातील वकिलांनीही राबविल्यास शेकडो गोरगरिबांना याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे या वकीलांचे म्हणणे आहे.

समाजसेवेच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. गोरगरीब व्यक्तीचा खटला चालवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

-अ‍ॅड. प्रशांत गाठे

जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एक केस मोफत चालवून आम्हाला सामाजिक बांधीलकी निर्माण करता येईल. सबका साथ सबका विकास, हे सरकारचे ब्रीद पूर्ण केल्याचे समाधान मिळेल.

-अ‍ॅड. रंजना मोपारी.सहसचिव, अचलपूर वकील संघ.

वंचित, दुर्बल घटकांना न्यायालयीन कामकाज मोफत उपलब्ध करून त्यांना अपेक्षित न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार.

-अ‍ॅड. सय्यद कलीम.

प्रत्येक वकील एक खटला मोफत लढवणार असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेणारा अचलपूर येथील वकील संघ हा भारतातील एकमेव आहे.

-अ‍ॅड. एन. एम. चौधरी,अध्यक्ष, अचलपूर वकील संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com