Vidhan Sabha 2019: नागपुरात टक्का घसरला, धक्का कुणाला? 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४६ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यात शहरातील ८४ उमेदवारांचा समावेश आहे. शहरात सरासरी ४९.८८ तर ग्रामीणमध्ये ६२.६२ टक्के मतदान झाले. 

विधानसभा 2019 :
नागपूर - जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या मतमोजणीतून पुढे येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४६ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यात शहरातील ८४ उमेदवारांचा समावेश आहे. शहरात सरासरी ४९.८८ तर ग्रामीणमध्ये ६२.६२ टक्के मतदान झाले. 

मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने राज्याचे लक्ष नागपूरकडे लागले आहे. शहरातून ८४ तर ग्रामीणमधून ६२ उमेदवार रिंगणात होते. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात फारसा उत्साह दिसून आला नाही. येथे यापूर्वीच्या तुलनेतही मतदान कमी झाले आहे. याचा फटका कोणाला बसेल हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र, आमची मते कमिटेड असून सर्वांनी मतदान केल्याचा दावा भाजपचा आहे. येथे सरासरी ४९.५१ टक्के मतदान झाले. काँग्रेसबहुल भागातील गुडधे यांच्या जयताळा केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. पश्‍चिम नागपूरमध्ये ४८.४५ टक्के मतदान झाले. येथे उच्चभ्रू वस्त्यांमध्ये उत्साह नव्हता. याउलट या परिसरातील मध्यमवर्गीय, हिंदी भाषकांच्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात मतदान झाले. येथे ४८.४५ टक्के मतदान झाले आहे.  उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, येथेच सर्वाधिक संथ मतदान झाले. येथे सरासरी ५०.७१ टक्के मतदान झाले. बसप अपेक्षेनुसार चालल्याचा दावाही केला जात आहे. याचा धोका काँग्रेसला होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less voting in Nagpur in Vidhan Sabha election