esakal | आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य

बोलून बातमी शोधा

prison

13 ऑगस्ट 2018 ला पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले. आगीत होळपल्याने महिलेचा मृत्यू झाला. ते यवतमाळ येथे राहत असल्याने विनोद अंबादास कणसे (रा. यणस, जि. अमरावती) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

आता जन्मभर सडावे लागेल तुरूंगात... केले होते हे भयानक कृत्य
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून मारल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर यांनी दिला. 

विनोद गुलाब अरसोड (वय 36, रा. तरनोळी, ता. दारव्हा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. माधुरी विनोद अरसोड, असे मृत महिलेचे नाव आहे. सदर तरुणाचा विवाह सहा वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील विनोद कणसे यांच्या मुलीसोबत झाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ तो करीत होता. आरोपी तरुणास माहेरच्या मंडळीनी समजावून सांगितले. मात्र, त्याने त्रास देणे सुरूच ठेवले.

13 ऑगस्ट 2018 ला पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविले. आगीत होळपल्याने महिलेचा मृत्यू झाला. ते यवतमाळ येथे राहत असल्याने विनोद अंबादास कणसे (रा. यणस, जि. अमरावती) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. पोलिस उपनिरीक्षक संदीप मुपडे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

इसको बोलते दिमाग! उन्हाळ्याच्या तोंडावर केली वृक्ष लागवड, आता घालत बसा पाणी

या खटल्यास सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपीविरुद्ध 302 भादंवीचे कलम समाविष्ठ केले. साक्षीपुरावे ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने मृताच्या मुलाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील एस. व्ही. दरणे यांनी काम पाहले.