Chandrapur News : व्हाट्सअप स्टेटस ठेवून युवकाने संपवले जीवन; ब्रम्हपूरीतील घटना
WhatsApp Status : जीवन यात्रा संपली..." असे स्टेट्स व्हॉट्सॲपवर टाकून वायगाव येथील अमोल वांढरे याने रेल्वे रुळावर जीवन संपवले. तो वीज वितरण कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता.
ब्रम्हपूरी : आपल्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप स्टेट्स वरती जीवन यात्रा संपवत असल्याचा मॅसेज लिहून रेल्वे रुळाखाली युवकाने आत्महत्या केली. ही घटना ब्रम्हपूरीपासून सुमारे दोन किमी अंतरावर रविवारी (ता.१) रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली.