बाबू अन्न-अन्न असते रे ते...काळ्या रानातील असो की, रस्त्यावरील !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

हरभरा दाने वेचण्यासाठी भर उन्हात सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती सतत एक-एक दाना वेचून दर दिवसाला दोन ते तीन किलो हरभरे वेचत आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसने स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणू न चूकता तोंडाला रुमाल बांधून सुरक्षितता जपत आहे.

तेल्हारा (जि. अकोला) : आज कोरोनामुळे सर्वत्र देशात लॉकडाउन झाले आहे कुणी कुठेही जाऊ शकत नाही. परंतु, मानवी जीवन हे अन्न, वस्त्र, निवारा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे आजवर कुठलेही युद्ध असो उपाशी पोटी होऊच शकत नाही. त्यामुळे यामध्ये मनुष्य असो की, प्राणी दोघांनाही पोट आहे. त्यामुळे आज आलेल्या जैविक कोरोनाच्या संकटावर संपूर्ण देश लढत आहे. कोणी घरी बसून लढत आहे तर कोणी देश सेवेतून लढत आहेत. शहरामधील इंदिरा नगर येथील रहिवासी गुंफाबाई जाधव (वय 70) दोन वेळच्या पोटाची खडगी भरण्यासाठी रस्त्यावरील हरभरा दाने वेचून जीवन जगण्यासाठी लढत आहेत.

हेही वाचा- 1910 साली दहा हजार भाविकांचा उल्लेख; मात्र आता...

मुल वेगळी राहतात... काही देत नाहीत आम्हाला
दर दिवसाला शहरातील एका-एका जिना समोरून जाणाऱ्या गाडीतील भरलेल्या पोत्यातून पडलेले हरभरा दाने वेचून आपला उदनिर्वाह करीत आहे. हरभरा दाने वेचण्यासाठी भर उन्हात सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती सतत एक-एक दाना वेचून दर दिवसाला दोन ते तीन किलो हरभरे वेचत आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसने स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणू न चूकता तोंडाला रुमाल बांधून सुरक्षितता जपत आहे. याबाबत त्या आजीला विचारणा केली असता, आजीने सांगितले की, शासनाचे श्रावण बाळ अनुदान दोन महिन्यांपासून मिळाले नाही. त्यामुळे घर कसे चालणार. मुले वेगळी राहतात ते आम्हाला काही देत नाही. त्यामुळे भीक मांगून जगल्यापेक्षा स्वतः स्वाभिमानाने मिळेल ते काम करते. पण वयानुसार कुणीही काम देत नसल्याने मी रत्यावरील अन्न उचलते बाबू. अन्न-अन्न असते ते! ते शेतातील काळ्या मातीचे असो की, रत्यावरील शेवटी आहे ते मातीतचन... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life on the road grains to fill the stomach