
यवतमाळ : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता. ६) दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील, येळाबारा, रोहटेक, गोपालपूर, तेजापूर व पिसगाव येथे वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. या चार घटनांमध्ये चौघांचा, तर १२ बकऱ्यांचाही मृत्यू झाला.