
चंद्रपूर : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना वीज कोसळल्याने गुरुवारी (ता.१७) रोजी तीन जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवार (ता. १८) दुपारच्या सुमारास आलेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील सिंदेवाही, नागभीड तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथील घटनेत संगीता सचिन चौधरी (वय ३७), तर नागभीड तालुक्यातील जिवनापूर टोला येथील घटनेत गणेश पांडूरंग वालके (वय २८) यांचा मृत्यू झाला.