esakal | अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांना अटक, कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

liquor seized in darvha of yavatmal

शहरातील कारंजा नाक्याजवळ नाकाबंदी असताना कार भरधाव जात होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी कार थांबवून तपासणी केली. कारमध्ये देशी दारूच्या 90 मिलीच्या आठ पेट्या आढळून आल्या.

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांना अटक, कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
अशोक काटकर

दारव्हा (जि. यवतमाळ): यवतमाळवरून दारव्हा तालुक्‍यातील घाटकिन्ही येथे अवैधरीत्या आणण्यात येणारी देशी दारू पकडण्यात आली. शनिवारी (ता.17) पहाटे चारच्या सुमारास नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी देशी दारूसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करीत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

नयन सौदागर, मेघराज दूधकोहळे (दोघेही रा. यवतमाळ) व विक्‍की राठोड (रा. घाटकिन्ही), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (ता.16) रात्री शहरातील कारंजा नाक्याजवळ नाकाबंदी असताना कार भरधाव जात होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी कार थांबवून तपासणी केली. कारमध्ये देशी दारूच्या 90 मिलीच्या आठ पेट्या आढळून आल्या. दारू, कार, तीन मोबाईल संच, असा एकूण दोन लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान दोन संशयित आरोपी फरार झाले आहेत. कारमधील दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर एकाला घाटकिन्ही येथून अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे, जमादार अशोक चव्हाण, शिपाई मोसीन चव्हाण, प्रेमानंद खंडारे, वाहनचालक घोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.