कुख्यात गुंड सनी समुद्रे स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर ः लकडगंजमधील कुख्यात गुंड सनी ऊर्फ मयूर धीरज समुद्रे (21, रा. सुदर्शन चौक) वर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्‌स, वाळू तस्कर आणि अत्यावश्‍यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीवर खून करण्याचा प्रयत्न करणे, जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणे, लैंगिक शोषण करणे, अश्‍लील कृत्य करणे तथा अश्‍लील गाणी गाणे, सरकारी नोकर काम करीत असताना दहशतीने त्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्याकरिता हल्ला शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपराधिक धमकी, हल्ला, दुखापतसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
त्याच्यावर लकडगंज पोलिस ठाण्यांत सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर 2017 मध्ये स्थानबद्धतेची कारवाई करून 1
वर्षाकरिता औरंगाबाद मध्यवर्ती कारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. तसेच 2019 मध्ये त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु, त्याने कारवाईचे उल्लंघन करून गैरकायदेशीर व धोकादायक गुन्हे करण्याची प्रवृत्ती निरंतर सुरूच ठेवले. त्याने सागर वाईन शॉपच्या मालकाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने बिअरच्या बॉटल घेऊन गेले होते. त्याचबरोबर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर पैशाची मागणी करणाऱ्या सेल्समनला जाळून टाकण्याची धमकी दिली होती व जबरदस्तीने स्वत:च्या गाडीत पेटोल भरून घेतले होते. तिसऱ्या एका गुन्ह्यात त्याने क्वेटा कॉलनी, लकडगंज येथील एका चायनीज फूड विक्रेत्याला धमकावून जबरदस्तीने त्याच्याकडील 1 हजार रुपये हिसकावून घेतले होते. या तीनही घटनांप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी 26 सप्टेंबर 2019 रोजी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची महत्त्वपूर्ण कारवाई केली आणि त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार, पोलिसांनी सनी समुद्रे याला मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथून ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Located in the notorious horde of sunny seas