Loksabha 2019 : प्रचार थांबला; उद्या मतदान    

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

विदर्भात सात लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा, मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आज, बुधवारपासून घराघरांतील प्रचारास सुरुवात होईल. मतदानापूर्वी उमेदवार विकासांपासून तर गुद्याच्या राजकारणापर्यंत प्रचार करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

नागपूर - विदर्भात सात लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा, मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आज, बुधवारपासून घराघरांतील प्रचारास सुरुवात होईल. मतदानापूर्वी उमेदवार विकासांपासून तर गुद्याच्या राजकारणापर्यंत प्रचार करीत असल्याचे चित्र दिसत आहे. आता पक्षाच्या अधिकाधिक ‘कमिटेड’ मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचवून मतदान वाढविण्याची रणनीती आखण्यात पक्ष संघटना कार्यरत झाल्या आहेत. उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना मतदार कितपत थारा देतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.  

विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी नागपूर, रामटेक, चंद्रपूर, चिमूर-गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम व वर्धा या सात मतदारसंघांत गुरुवारी मतदान होईल. या सातही  मतदारसंघामध्ये दुहेरी लढतीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तर बसप, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, खरी लढत भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राकाँ आघाडी असाचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत स्थानिक विकासाच्या मुद्द्यांपेक्षाही जात प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत होते. विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती; तर काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 elelction promotion stopped Voting tomorrow