

Buldhana News
esakal
लोणार : खरीप हंगामाच्या तोंडावर लोणार तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नांगरणी, वखरणीची लगबग सुरू असताना पेट्रोल पंपावर डिझेल-पेट्रोल वितरणात मोठा सावळा गोंधळ उडाला आहे. ‘सेटिंग’ असणाऱ्यांनाच मागच्या दाराने इंधन मिळते, तर सर्वसामान्य शेतकरी व वाहनधारकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडुन होत आहे.