

Buldhana News
esakal
लोणार: जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल ९ कोटी ८८ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.