Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती
Maharashtra Tourism : लोणार सरोवराच्या विकासासाठी पर्यटन माहिती केंद्र आणि प्रयोगशाळेची कामे पूर्ण झाली आहेत. या केंद्रात पर्यटकांना लोणार सरोवराची वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय माहिती मिळवता येईल.
लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) अमरावती विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामांना आता गती मिळू लागली आहे.