Lonar Lake : उत्तम व्यवस्थापनात लोणार अभयारण्याचा देशात दहावा क्रमांक
Sanctuary Ranking : जगप्रसिद्ध बेसाल्ट खडकातील लोणार सरोवर अभयारण्याने संपूर्ण देशातील वन व्यवस्थापन मूल्यमापनात दहावा क्रमांक पटकावला. हे महाराष्ट्राचे आणि बुलडाण्याचे मोठे गौरवस्थान ठरले आहे.
लोणार : भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये जगविख्यात लोणार सरोवर अभयारण्याला जंगलांच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये देशात दहावा क्रमांक प्राप्त झाला आहे.