Accident : लोणार सरोवरच्या काठावर गाडीला अपघात; एक ठार, तीन जखमी

जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पुढे किन्ही गावाजवळ मार्गावर इनोव्हा गाडीला झालेल्या अपघातात गाडीतील एक जण जागीच ठार
Accident
AccidentSakal

लोणार - जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पुढे किन्ही गावाजवळ मार्गावर इनोव्हा गाडीला झालेल्या अपघातात गाडीतील एक जण जागीच ठार झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

लोणार सरोवराला किन्ही गावाजवळ वळण रस्ता आहे. या वळण रस्त्यावर इनोव्हा क्रमांक एम.एच. 01 ए.एक्स. 9898 भरधाव वेगात जात असताना चालकाचे वाहनावर नियंत्रण सोडून गाडी रस्त्याच्या काठावर खाली पलटी होऊन भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील सूरज शिवाजी गुडवे रा. ठाणे जिल्हा ठाणे (वय-25) हा जागीच ठार झाला. तर इतर तीन जखमी झाले.

जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस स्टेशनला घटनाची माहिती मिळताच पोलीस निरक्षक निमिश मेहेत्रे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, पो. जमदार बन्सी पवार, पो. जमदार संतोष चव्हाण, पो. लेखनिक गणेश लोंढे, पो. बोरे, पो. निकस, पो. भोकरे, ट्रॉफिक पो. गजानन शेजुळ, ट्रॉफिक पो. गीते यांनी धाव घेतली असुन जखमींना उपचारासाठी रूग्णांल्यात दाखल केले. असून पुढील तपास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com