इस्कॉन नागपुरात उभारणार लोटस टेम्पल - लोकनाथ स्वामी महाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर - आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मिहानजवळील इम्पोरियन टाउनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैदिक कल्चर सेंटर उभारणार आहे. पाच एकरातील लोटस टेम्पल हे देशातील वैदिक कल्चर सेंटर राहणार असून, एका एकरात कृष्णा भावनामृत गार्डन विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आणि नोएडाचे विभागीय सचिव लोकनाथ स्वामी महाराज यांनी आज पत्रकारांना दिली.

इम्पोरियम टाउनशिपमधील पाच एकरमधील वैदिक कल्चर सेंटर कमळाच्या फुलाच्या आकारात राहणार आहे. एक एकरात कृष्णाच्या लीलांवर आधारित वृंदावन गार्डन राहणार असून, त्यात साउंड ऍण्ड लाईट शो राहणार आहे. मंदिराच्या इमारतीतील एक हजार लोकांना उभे राहून दर्शन घेता येईल असे दर्शन मंडप आहे. 1500 व्यक्तीं बसू शकतील असा प्रसादम हॉल, माहिती केंद्र आणि सामूहिक सभागृह, एक हजार लोकांच्या क्षमतेचे बहुपयोगी सभागृह यात बांधण्यात येणार आहे. याशिवाय 1500 लोकांना बसता येईल असे वैदिक संस्कार सभागृह, हरिक्रिष्णा धार्मिक मॉल, गोविंद रेस्टॉरंट, वैदिक शिक्षण देणारे केंद्र आणि वेदांत वाचनालय, वरिष्ठ संन्यासी आश्रम, आजीवन सदस्यांसाठी धार्मिक पर्यटकांसाठी विश्रामगृह, साउंड आणि लाइट शोच्या माध्यमातून कृष्णाच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात येणार आहे. तसेच ब्रह्मचारी आश्रम आणि गौशालाही येथे राहणार आहे. पाणी हे धार्मिक कामासाठी अतिशय उपयुक्त असल्याने त्याचाही वापर लॅण्डस्केपमध्ये करण्यात येणार आहे, असेही लोकनाथ स्वामी म्हणाले.

पत्रकार परिषदेला आर्किटेक्‍ट परमजित आहुजा, फाअर आर्करचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ सराफ, रेव्हीड फ्रेडमन, गौरकृष्णदास, डॉ. श्‍यामसुंदर शर्मा उपस्थित होते.

गांडूळखताचा वापर बगीच्यासाठी
संपूर्ण इमारात ग्रीन संकल्पनेवर आधारित आहे. बायोगॅस आणि गांडूळखताचा वापर संपूर्ण बगीच्यासाठी केला जाणार आहे. इस्कॉनचे हे लोटस टेम्पल जगात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करेल असा दावाही त्यांनी केला. इस्कॉन हे ब्रॅण्ड झाले असून हा प्रकल्प ग्लोरी ऑफ इंडिया राहील असेही लोकनाथ स्वामी यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lotus temple in Nagpur by iskcon