हळद लावण्याच्या दिवसापासून नवरदेव ‘नॉट रिचेबल’

वधू-वराकडील आनंदावर विरजण; वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
love crime youth missing from marriage hall police chandrapur
love crime youth missing from marriage hall police chandrapuresakal
Updated on

वरोरा (जि. चंद्रपूर) : रीतिरिवाजाप्रमाणे विवाह ठरला. साक्षगंधही झाले. विवाह तिथी काढून निमंत्रण पत्रिका आप्तेष्टांना देण्यात आल्या. वर-वधूकडे पाहुणे मंडळी जमली. २१ ऑगस्ट विवाहाचा दिवस होता. २० ऑगस्ट रोजी नवरदेवाला हळद लावण्याची तयारी झाली. त्याच दिवशी दुपारी बाराच्या सुमारास दाढी करण्याकरिता नवरा मुलगा घराबाहेर पडला. मात्र, तो घरी पोहोचला नाही. त्याचा भ्रमणध्वनी ‘नॉट रिचेबल’ असल्याने वधू-वराकडील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले. शहरातील सरदार पटेल वॉर्डात राहणाऱ्या युवकाचा विवाह हिंगणघाट येथील युवतीशी जुळला. साक्षगंधही पार पडले.

विवाह २१ ऑगस्ट रोजी हिंगणघाट येथील नागपूर रोडलगतच्या मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता ठरला होता. त्यामुळे वधू-वराकडील मंडळींनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. वराकडील मंडळी विवाहाचा दिवस येऊनही प्रतिसाद देत नसल्याने युवतीकडील मंडळी युवकाच्या घरी पोचली. त्यानंतर त्यांना सगळा प्रकार कळताच चांगला धक्का बसला. विवाहाच्या दिवसाचा मुहूर्त निघाला; परंतु त्या युवकाचा शोध लागला नाही. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली.

दाढी करण्याकरिता गेला, मात्र परतलाच नाही

२० ऑगस्ट रोजी वराकडे हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. वर युवक त्याच दिवशी दुपारी बारा वाजताच्या सुमारास दुचाकी घेऊन घरातून दाढी करण्याकरिता बाहेर पडला. मात्र, बराच वेळ लोटल्यानंतरही तो परत आला नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो ‘नॉट रिचेबल’ येत आहे. त्याची दुचाकी वरोरा शहरातील आनंदवन चौकात आढळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com