तरुणीला घेऊन पसार झालेल्या युवकाची अशी केली धुलाई

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

समशेरचे सहा-सात महिन्यांपासून एका विद्यार्थिनीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही गुरुवारी (ता. 13) सकाळी सात वाजता वाहनाने तेंलगणा राज्यात पळून गेले. हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर शनिवारी (ता. 15) सायंकाळी तरुणीच्या वडिलांच्या मोबाइलवर दोघांनी संपर्क साधला व "लग्न करायचे आहे', असे सांगितले.

यवतमाळ : येथील 28 वर्षीय युवकाने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून बाहेर फिरायला घेऊन जात होता. एकेदिवशी तो युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तेलंगणा राज्यात घेऊन गेला. पालकांनी युवतीची कशीबशी सुटका केली. तसेच युवकाचे अपहरण करून शेतातील एका शेडमध्ये नेऊन जबर मारहाण केली. ही घटना रविवारी (ता. 16) सकाळी आर्णी मार्गावरील चिरडे हॉस्पिटलसमोर घडली. समशेर अहमद वल्द शब्बीर अहमद (वय 28, रा. अलमासनगर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा - ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन...

समशेरचे सहा-सात महिन्यांपासून एका विद्यार्थिनीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही गुरुवारी (ता. 13) सकाळी सात वाजता वाहनाने तेंलगणा राज्यात पळून गेले. हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर शनिवारी (ता. 15) सायंकाळी तरुणीच्या वडिलांच्या मोबाइलवर दोघांनी संपर्क साधला व "लग्न करायचे आहे', असे सांगितले.

यावर वडिलांनी "मुलीची आई खासगी रुग्णालयात भरती आहे. तुम्ही परत या, लग्न लावून देतो' असे सांगितले. त्यानुसार दोघेही रविवारी सकाळी यवतमाळात परत आले. ऑटोने चिरडे हॉस्पिटल येथे पोहोचताच वडिलांनी युवतीला प्रियकरापासून वेगळे केले. रजिक पटेल, अब्रार पटेल यांच्यासह अन्य दोघांनी समशेर याला जबरदस्तीने ऑटोत बसविले आणि येरद शिवारातील शेतात नेले.

टिनाच्या शेडमध्ये हातपाय बांधून बेल्ट व पाइपने समशेरला मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी देत काही वेळानी यवतमाळात आणून सोडले. यानंतर समशेर अहमद याने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून राजिक पटेल, अब्रार पटेल यांच्यासह अनोळखी दोघांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

समशेर विवाहित
समशेर अहमद हा विवाहित असून, दोन मुलींचा बाप आहे. दत्त चौकात हातठेल्यावर कपडे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सहा-सात महिन्यांपासून इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत पळ काढला होता. पळून गेल्यानंतर युवतीच्या वडिलांनी लग्नास होकार देत दोघांनाही हुशारीने यवतमाळात बोलावले व समशेरची चांगलीच धुलाई केली.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love story of 28 years old man & 16 years old girl