
मोताळा : तालुक्यातील सारोळा मारोती परिसरात रविवारी (ता. १८) सकाळी एका विमानाने आकाशात सहा ते सात घिरट्या घातल्याची माहिती आहे. त्यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सदर विमान कशाचे याबद्दल तालुका प्रशासन अनभिज्ञ असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.