Fire Accident : लक्की पेट्रोलियम कारखाना खाक; बदकी इंडस्ट्रीजचेही नुकसान, एमआयडीसी परिसरात भीषण आग
Lucky Petroleum : चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील लक्की पेट्रोलियम कारखान्यात सोमवारी भीषण आग लागली. या आगीत बदकी इंडस्ट्रीजसुद्धा प्रभावित झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर : येथील एमआयडीसी परिसरातील लक्की पेट्रोलियम कारखाना आगीत खाक झाला. सोमवारी (ता. २४) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ऑइल तयार करणाऱ्या या कारखान्यात भीषण आग लागली.