Lumpy : लम्पी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy Virus

Lumpy : लम्पी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर

बुलडाणा : जनावरात आढळून आलेल्या लंपी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावरून नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लंपी आजाराची जनावरे आढळून आल्याने या रोगाचा प्रसार झालेला असून बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करुन आजावर नियंत्रण करण्यात येत आहे.

आजारासंबधी पशुपालकांच्या तक्रारी निवारण करण्याकरिता पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९६२ व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०७२६२-२४२६८३ व टोल फ्री क्रमांक १०७७ सुरु करण्यात आला आहे. या आजारासाठी वेळीच उपचार केल्यास जनावरे पुर्णपणे बरी होतात, तसेच मनुष्यास या आजाराच्या संसर्गाचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पशू पालकांनी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.

Web Title: Lumpy Toll Free Number Announced Animal Virus Citizens Informed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..