लिम्फोमा कॅन्सर वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर ः रक्ताच्या विविध कॅन्सरमध्ये 30 ते 40 टक्के लिम्फोमा कॅन्सरचे रुग्ण आढळत असून बदलत्या जीवनशैलीमुळे या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. विशेष असे की, ऍडव्हॉन्स टप्प्यातील रोगाला हाय डोस किमोथेरपी दिली जाते व शक्‍य असल्यास स्टेम सेल ट्रान्सप्लांट केले जाते. किमोथेरपी जलद गतीने वाढणाऱ्या कॅन्सर पेशी तसेच रक्त पेशी, केस, अन्न नलिकेच्या पेशींनादेखील अटकाव करते. यामुळे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रुग्णांना या लिम्फोमा कॅन्सरापासून दिलासा मिळत असल्याचे मत रक्त कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रिया बालीकर यांनी व्यक्त केले.

सप्टेंबर महिना हा लिम्फोमा तसेच इतरही रक्‍ताच्या कॅन्सरसंदर्भातील जनजागृती महिना म्हणून ओळखला जातो. हे निमित्त साधून कॅन्सरवर उपचार करणाऱ्या जगभरातील संस्थांच्या माध्यमातून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येते. लिम्फोमा हा रक्‍ताच्या कर्करोगाचा दुसरा प्रकार आहे. यात 30-40 प्रकारचे लिम्फोमा आढळतात. प्रामुख्याने हॉचकिन आणि नॉन-हॉचकिन असे दोन प्रकार आहेत.
जगाच्या तुलनेत आपल्या देशात या रोगाचे प्रमाण कमी आहे. साधारणपणे असून दरवर्षी भारतात 10 हजार रुग्ण नव्याने आढळून येतात. यापैकी 5 हजार रुग्ण दगावतात. वयाची 25 ते 30 वर्षे व 70 ते 80 वर्षे या कालावधीदरम्यान आढळतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. नोड्यूलर व क्‍लासिक हॉचकिन लिम्फोमा हे मुख्य प्रकार असतात.
या आजारात रुग्णाच्या मानेत, काखेत किंवा जांघेत गाठ आढळून येते. या प्रकारात रुग्णाच्या गाठीची तपासणी, आय एच. सी.ची चाचणी या गाठीचा प्रकार शोधण्यासाठी होतो. पेट-स्कॅन व बोन मॅरो चाचणीतून याचे निदान होते. हा आजार आपल्या शरीरातील रसग्रंथी (लिम्फ नोड्‌स) आणि रस वाहिन्यांशी (लिम्फॅटिक्‍स) तसेच या संस्थेशी संबंधित असलेल्या टॉन्सिल्स, पाणथरी, थायमस अशा शरीरातील अवयवांशी संबंधित आहे. रक्तवाहिन्यांप्रमाणेच रसवाहिन्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते.

लिम्फोमा होण्याची कारणे
लिम्फोमा नेमका कशामुळे होतो याचा अजून तरी शोध लागलेला नाही. परंतु, काही गोष्टी या रोगाशी निगडित आहेत. इबस्टन वायरस, हिपॅटायटीस बी. व सी, पायलोरी, प्रतिकारशक्ती कमी करणारे रोग, एड्‌स, व काही अनुवंशिक सिन्ड्रोम. शरीरातल्या लिम्फॅटिक संस्थेला ग्रासले जाते. लिम्फो साइट्‌सची संख्या अमर्याद वाढते आणि रसग्रंथी आकाराने खूप मोठ्या होतात. हा आजार चौथ्या स्टेजमध्ये असला तरी, त्यावर खात्रीशीर उपाय केला जातो. 60 टक्के रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.

लिम्फोमा कॅन्सरची लक्षणे आणि क्षयरोगाच्या लक्षणांमध्ये काही प्रमाणात साम्य दिसून येते. यामुळे अनेकदा रुग्ण क्षयरोगाची औषधी घेत असतात. पुढे लिम्फोमा कॅन्सर असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. यामुळे लक्षणे आढळताच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. रिया बालीकर, रक्तकॅन्सरतज्ज्ञ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lymphoma cancer is on the rise