

मलकापूर : येथील वीट निर्मिती कारखाना मालकास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर ती रक्कम स्वीकारतांना लालबाग पोलिस स्टेशन (मध्यप्रदेश) मध्ये कार्यरत हेडकॉन्स्टेबल पवन शर्मा यास इंदोर लोकायुक्त पथकाने ५ डिसेंबर रोजी रंगेहात अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी एका हेडकॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.