Mahabeej : ‘महाबीज’कडून भागधारकांना ३० टक्के लाभांश जाहीर...गतवर्षी झाली पाच लाख ७६ हजार क्विंटल बियाणे विक्री
Highest seed sale : महाबीजने २०२३-२४ या वर्षात पाच लाख ७६ हजार क्विंटल बियाणे विक्री करत भागधारकांसाठी ३० टक्के लाभांश जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांचा पुरवठा हे उद्दिष्ट ठेऊन संस्था पुढे सरसावत आहे.
अकोला : राज्यातील शेतक-यांना चांगले बियाणे रास्त दरात मिळण्याचे उद्दिष्ट बाळगून ‘महाबीज’ची वाटचाल सुरू असून, २०२३-२४ या वर्षातील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात एकूण पाच लाख ७६ हजार २१९ क्विंटल बियाणे विक्री झाली आहे.