Mahagaon Hospital Attack: रुग्णालयात हल्लेखोरांचा थरार! काचा फोडल्या, ‘मारून टाकतो’च्या धमक्या; डॉक्टर-नर्स बाथरूममध्ये लपले

Mahagaon Hospital Attack Doctors And Nurses Hide In Bathroom: आरोग्यसेवकांवर जीवघेणा हल्ला, काचा फोडत ‘मारून टाकतो’च्या धमक्या; महागाव ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Mahagaon Rural Hospital Violence Doctors And Nurses Fear For Life After Mob Attack And Death Threats

Mahagaon Rural Hospital Violence Doctors And Nurses Fear For Life After Mob Attack And Death Threats

sakal

Updated on

-गणेश भोयर

महागाव : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाच मंगळवारी (१८ ऑगस्ट) रात्री आपला जीव वाचविण्यासाठी बाथरूममध्ये लपून बसण्याची वेळ आली. अपघातात जखमी झालेला शेख इसराइल शेख शाबुद्दीन हा ड्रेसिंग करून घेण्यासाठी रुग्णालयात आला होता. त्यावेळी डॉक्टर-कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर तो ‘तुम्हाला दाखवतो’ असे म्हणत निघून गेला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने १० ते १२ जणांना सोबत घेऊन तो पुन्हा रुग्णालयात आल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com