Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

₹4,000 Bribe Demanded for Timber Transport Permit : जुन्या घरातून निघालेले सागवानी लाकूड उमरखेडला नेण्यासाठी वाहतूक परवाना मिळवून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल, वनमजूर आणि कंत्राटी संगणक ऑपरेटरविरुद्ध एसीबीने कारवाई केली.
Timber Transport Bribe

Timber Transport Bribe

esakal

Updated on: 

महागाव (जि. यवतमाळ) : वडिलोपार्जित जुने घर पाडल्यानंतर निघालेले सागवानी लाकूड वाहून नेण्यासाठी वाहतूक परवाना (टीपी) मिळवून देण्याच्या मोबदल्यात शासकीय चलनाव्यतिरिक्त चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल, वनमजूर आणि कंत्राटी संगणक ऑपरेटर अशा तिघांविरोधात एसीबीने कारवाई केली. कंत्राटी संगणक ऑपरेटर चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी (ता. ३०) रंगेहात सापडला.

दगडथर येथील ६० वर्षीय शेतकऱ्याला जुन्या घरातून निघालेले सागवान लाकूड नवीन बांधकामासाठी उमरखेड येथे नेण्यासाठी वाहतूक परवानगी हवी होती. त्यासाठी संबंधित विभागाकडे त्याने नियमानुसार अर्ज केला होता. मात्र, सातशे रुपयांचे शासकीय चलन भरावे लागेल आणि त्याव्यतिरिक्त चार हजार रुपये द्यावे लागतील, तरच परवानगीचे काम होईल, अशी मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

पैसे न दिल्यास परवाना अडवून ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदाराने केला. त्यानंतर त्याने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने २९ सप्टेंबरला पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी कंत्राटी संगणक ऑपरेटर विनोद सोळंके, वनपाल आनंद बोरेकर आणि वनमजूर जयवंत ढगे यांचा या प्रकरणातील सहभाग आढळून आल्याचे एसीबीने नमूद केले. विनोद सोळंके याच्यासह वनपाल आनंद बोरेकर (वय ३८) आणि वनमजूर जयवंत ढगे (वय ५५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी झडती घेण्याची कारवाई एसीबीकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

वनकार्यालयातच सापळा एसीबीने बुधवारी (ता. ३०) दुपारी साडेचारच्या सुमारास महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील संगणक कक्षात सापळा रचला. तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी संगणक ऑपरेटर विनोद सोळंके (वय ३८, रा. टेंभी) याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या टेबलवरून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com