

Administration's crackdown before boring! Machine seized at Waghnath in Mahagaon taluka.
Sakal
महागाव : दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना भूजलसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महागाव तालुक्याचा समावेश ‘ट्रिगर-१’मध्ये झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने बोअरवेल, विहीर तसेच अन्य माध्यमातून पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर निर्बंध घातले आहेत. या आदेशाची पायमल्ली करीत वाघनाथ येथे बोअरवेल खोदण्यासाठी आणलेली मशीन महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईपूर्वीच जप्त केली. भूजल उपशासाठी घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीतील ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.