महाराष्ट्रात ५ वर्षात ३६ हजार कंपन्या बंद पडल्या, केंद्र सरकारने सांगितलं असलं तरी माहिती तपासणार : उद्योगमंत्री सामंत

राज्यात कंपन्या बंद पडल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं असलं तर या माहितीचा आधार आणि वस्तुस्थिती पडताळण्यासाठी एक दिवसाचा वेळ हवा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय.
Uday Samant Says Maharashtra Will Verify Centre’s Company Closure Data

Uday Samant Says Maharashtra Will Verify Centre’s Company Closure Data

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर, ता. १२ : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद पडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा आकडा नेमका कोणत्या आधारे समोर आला, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी बुधवारी (ता. १२) स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली असली तरी तिचा आधार आणि वस्तुस्थिती पडताळण्यासाठी एक दिवसाचा वेळ हवा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com