
अमरावती : समाजात कायम दुर्लक्षित घटक असलेल्या दृष्टिहिनांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असतानाही त्याकडे लक्ष देण्यास कुणालाच सवड नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यातच पूर्णतः व अंशतः अंध अशा दोन संकल्पनांच्या फेऱ्यात अडकलेले अनेक दृष्टिहीन बांधव जीवनाची लढाई लढत आहेत. मात्र, त्यांना पुनर्वसन तसेच भक्कम आर्थिक बळ देणे आवश्यक झाले आहे.