
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, आणि वंचितांच्या हक्कांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी हे आंदोलन सुरू आहे. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली, पण ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. यावेळी बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी जोरदार भाषण करत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.