सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत, कोण म्हणाल असं, वाचा

अतुल मेहेरे
Sunday, 16 August 2020

राज्यासह देशभरात सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण सध्या गाजत आहे. सुशांत सिंह मुळ बिहारचा आहे आणि तेथील निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह मुख्य मुद्दा राहणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

गोंदिया : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे. कारण, महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलॅंड यार्डच्या पोलिसांसोबत केली जाते. या आणि इतरही क्लिष्ट प्रकरणांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सक्षम आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अनिल देशमुख गोंदिया येथे आले होते. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय येतो, यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पण, महाराष्ट्र पोलिस पूर्ण क्षमतेने या प्रकरणाचा तपास करीत आहे आणि छडा लावण्यच्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.

क्लिक करा - अगोदर चाकूने वार, दगडाने ठेचून खून नंतर जंगलात पुलाच्या पाईपमध्ये लपविला मृतदेह, पुढे...

राज्यासह देशभरात सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण सध्या गाजत आहे. सुशांत सिंह मुळ बिहारचा आहे आणि तेथील निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह मुख्य मुद्दा राहणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्र कनेक्शन बिहारच्या निवडणुकीत मोठा मुद्दा ठरणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यादृष्टीने काही राजकीय पक्षांनी राजकीय निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्याची सुरुवातही केली आहे.

सर्वांनी आपापले म्हणणे मांडले

सुशांत सिंह प्रकरणात सर्वांनी आपापले म्हणणे मांडले आहे. ही प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढील आठवड्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. जसा निर्णय येईल, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra government opposes handing over Sushant Singh case to CBI