
वर्धा : शासनाने सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळे दिले. त्यातून सिंचन करण्याकरिता आतापर्यंत विजेवर चालणारे कृषीपंप होते. परंतु, शासनाने आता शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषीपंप देण्यास नकार देत सिंचनाकरिता सोलरपंप वापरण्याची सक्ती केली आहे. शासनाचे हे धोरण पर्यावरणपूरक असले तरी शेतकऱ्यांकरिता ते अडचणीचे ठरत आहे.