Disabled Rights : महाराष्ट्रात दिव्यांगांना सर्वांत कमी मानधन; अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचेही दुर्लक्ष
Government Schemes : महाराष्ट्रात दिव्यांगांना सर्वांत कमी मानधन मिळत असून, शासनाच्या अनेक योजनांचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे देखील दिव्यांगांची उपेक्षा करण्यात येत आहे.
यवतमाळ : राज्यात लाखोंच्या संख्येने दिव्यांग बांधव आहेत. त्यांनाही योग्यरीत्या जीवन जगता यावे, त्यांच्याही अधिकारांचे रक्षण व्हावे, यासाठी शासनाकडून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.