
मांजरखेड : जिल्हा परिषदेच्या शाळेत भाषा, विज्ञान व गणित पेटी नंतर आयसीटी पेटी दिसणार आहे. या पेटीच्या माध्यमातून वर्गात आयसीटी कोपरा विकसित केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे या पेटीत आय. आर., व्ही. आर., ॲलेक्सासारखे आधुनिक विविध साहित्याचा समावेश राहणार आहे. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी इगतपुरी येथे आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत शाळांमध्ये आयसीटी पेटी दिसणार असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत अमरावती जिल्ह्यातील अंकुश गावंडे या हरहुन्नरी शिक्षकाच्या आग्रही मागणीला उत्तर देताना ‘तुमची ॲलेक्सा शाळेत बोलणार’, अशी शाबासकी दिली.