.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
यवतमाळ, ता. ८ : यंदा मॉन्सूनची एन्ट्री विलंबाने झाली.तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठली आहे.आतापर्यंत ९८. २८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्यातही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. आजघडीस जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोट्या, मोठ्या प्रकल्पात ९८.४५ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे सहा प्रकल्पातून पाण्याचा विसर्गसुद्धा सुरू आहे.