"महारथी कर्ण'मधून ऐतिहासिक नाट्यकृतीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 August 2019

नागपूर : इतिश्री आर्टस्‌ आणि संस्कार भारती नागपूर महानगरतर्फे "महारथी कर्ण' या हिंदी भाषेतील महाकाव्यावर आधारित नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. यातून ऐतिहासिक नाट्यकृतीचे दर्शन घडविण्यात आले.

नागपूर : इतिश्री आर्टस्‌ आणि संस्कार भारती नागपूर महानगरतर्फे "महारथी कर्ण' या हिंदी भाषेतील महाकाव्यावर आधारित नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. यातून ऐतिहासिक नाट्यकृतीचे दर्शन घडविण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ. नंदिता साहू यांनी लिहीलेल्या दोन अंकी हिंदी नाटकाचे दिग्दर्शन दिपाली घोंगे यांनी केले. दीपाली घोंगे यांनी यापूर्वी युगंधर, कृष्णा बावरी आदी नाट्य प्रयोग केले आहेत. या प्रयोगाप्रमाणेच "महारथी कर्ण' या नाटकानेसुद्धा प्रेक्षकाना मंत्रमुग्ध केले. प्रयोगा दरम्यान दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी पराग घोंगे, प्रियांका ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नाटकामधील निखिल टोंगळे (कर्ण) सारंग गुप्ता (युवा कर्ण), शंतनू सोनी (दुर्योधन), गौरव राऊत (शकुनी), जय गाला (कृपाचार्य), मधुरा समक (माला), रश्‍मी बडगे (कुंती), मयुरी टोंगळे (वृषाली), कल्याणी गोखले (राधा मॉं), अनमोल निचट (कृष्णा), नुपूर बडगे (द्रौपदी), शुभम सप्रे (परशुराम), सुशील तिवारी (भीष्म), व्यंकटेश अयचित (अर्जुन) यांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्टपणे बजावल्या. अडीच ते दोन तासांच्या या प्रयोगाचे प्रेक्षकानी टाळ्यांनी कौतुक केले. लेखक डॉ. नंदिता साहू यांचे नाटकातील हृदयस्पर्शी संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेले. नाटकासाठी प्रत्येक कलावताची दिग्दर्शकाने केलेली योग्य निवड व सोबतीला प्रभावी संगीत, वेशभूषा, प्रकाशयोजना आणि त्याद्वारे केलेला सावल्यांचा वापर नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharthi Karna drama news