उपराजधानीत पुन्हा महावितरणराज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : उपराजधानीतील तीन विभागांमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून वीज वितरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसएनडीएल फ्रेन्चाईझीला हद्दपार करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्रीपासून महावितरणकडून या क्षेत्रातील वीज यंत्रणेचा ताबा घेतला जाणार असल्याची अधिकृत घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

वीजहानी मोठ्या प्रमाणावर असल्याने 1 मे 2011 पासून महाल, गांधीबाग व सिव्हिल लाइन्स या तीन विभागांत वीज वितरणाची जबाबदारी फ्रेन्चाईझीकडे सोपविण्यात आली होती. त्यावेळी 30.06 टक्‍क्‍यांवर असलेली वीजहानीचे प्रमाण एसएनडीएलने 13.74 टक्‍क्‍यांवर आणले. परंतु, तक्रारींचा ओघ कायम होता. समितीच्या अहवालानंतर एसएनडीएलने मोठ्या प्रमाणावर कामेही केलीत. आर्थिक डबघाईस आल्याचे कारण देत एसएनडीएलने 12 ऑगस्ट व 6 सप्टेंबरला पत्र देऊन शहरातील वीजवितरण व्यवस्था सांभाळण्याची सूचना महावितरणला केली. त्यानुसार यंत्रणा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. फ्रेन्चाईझी क्षेत्रातील ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून वितरण व्यवस्था ताब्यात घेण्यात येणार आहे. वितरण फ्रेन्चाईझी क्षेत्रातील ग्राहकांना महावितरण अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यात यशस्वी ठरेल. यापुढे उपराजधानीत कधीही फ्रेन्चाईझी येणार नाही, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavitaranraj again in the Nagpur