

Amravati Municipal Corporation
sakal
अमरावती : महापालिकेच्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांसह आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी दिलेल्या यादीनुसार महापौरांनी या नावांची घोषणा शुक्रवारी (ता.२०) झालेल्या पहिल्या आमसभेत केली. स्वीकृत सदस्यांमध्ये माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. स्थायी समितीत महायुतीचे अकरा सदस्य असून त्यांचे या समितीवर वर्चस्व आहे.