...अन् पती-पत्नीच्या विजयानं उघडलं राष्ट्रवादीचं खातं

NCP Won Candidate Gondpipari Nagarpanchayat election
NCP Won Candidate Gondpipari Nagarpanchayat electione sakal

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावखेडयातील निवडणुका म्हणजे लय भारी. नगरपंचायत निवडणुकात स्थिती वेगळी नाही. आज गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमालच झाली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि पती-पत्नी दोघांनीही बाजी मारली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. पती-पत्नीच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रावादीने (NCP) खातं उघडलं.

NCP Won Candidate Gondpipari Nagarpanchayat election
बुलडाणा : बच्चू कडूंची जोरदार एन्ट्री', भाजपच्या माजी मंत्र्यांवर 'प्रहार'

ओबीसी आरक्षण (OBC Resrvation) रदद झाल्यामुळे तीन प्रभागाच्या निवडणुका लांबणीवर गेल्या. तीन प्रभागासाठीची निवडणूक १८ जानेवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादीचे (NCP) महेद्रसिंह चंदेल यांच्या पत्नी सविता चंदेल या उभ्या होत्या. काँग्रेसच्या सारिका माडूरवार, भाजपच्या प्रांजली बोनगिरवार, शिवसेनेच्या गिता बैस या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

गोंडपिपरी नगरपंचायतीच्या सतरा प्रभागाच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर करण्यात आले. सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रभाग क्रमांच पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेद्रसिंह चंदेल यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करीत असतानाच प्रभाग क्रमांक सहाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महेंद्रसिंह चंदेल यांची पत्नी सविता चंदेल या बहुमताने निवडून आल्याचे स्पष्ट झाले. दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत पती-पत्नी निवडून आल्याचे समजताच त्यांच्या समर्थर्कांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.

गोंडपिपरी नगरपंचायतीच्या आज आलेल्या निकालात काँग्रेसचे सात, भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन तर अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले. पण, बहुमत कोणालाच नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी काहीतरी तडजोड करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com