Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

ठाणा गावाजवळ ट्रकच्या दोरखंडाला बांधलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह; गळ्यावर-पायांवर जखमा, रक्ताचे डाग पाहता आत्महत्येऐवजी घातपाताची शक्यता गडद
Highway Mystery: Unidentified Circumstances Surrounding Truck Driver’s Death Near Amgaon

Highway Mystery: Unidentified Circumstances Surrounding Truck Driver’s Death Near Amgaon

sakal
Updated on

आमगाव (जि. गोंदिया) ः गोंदिया-आमगाव महामार्गावरील ठाणा गावाजवळच्या माही ढाबा परिसरात एका ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह ट्रकच्या दोरखंडाला बांधलेल्या अवस्थेत बुधवारी (ता. २७ ) सकाळी आढळून आला. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असला तरी शरीरावरील जखमा, रक्ताचे डाग आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता घातपाताची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, आमगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com