भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

file photo
file photo

वरुड (जि. अमरावती) : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्‍सने मोटरसायकला जबर धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी (ता.21) सकाळी तालुक्‍यात घडली. 

प्रकाश रामकिसन सोनारे (वय 45), जयश्री सोनारे (वय 35), जयकुमार (वय 11) व वैष्णवी (वय 5), असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनारे कुटुंब हे तालुक्‍यातीलच मालखेड येथील रहिवासी आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या वर्धमनेरी या गावाला ते जात असताना वरुड-राजुराबाजार मार्गावर हा भीषण अपघात झाला. 

ट्रॅक्‍सची वाहनाला जबर धडक 
जयश्री सोनारे यांचे माहेर वर्धमनेरी येथील आहे. त्याठिकाणी एका तेरवीच्या कार्यक्रमासाठी हे कुटुंब जात होते. प्रकाश सोनारे यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात फवारणी आटोपली व एकाच मोटरसायकलने आपल्या कुटुंबासह ते निघाले होते. राजुराबाजार रोडवर एका ट्रॅक्‍सने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या घटनेत चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 

ट्रॅक्‍सचालक तसेच मालकावर गुन्हा दाखल करा 
चौघांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणीसुद्धा मोठा जमाव झाला होता. संबंधित ट्रॅक्‍सचालक तसेच मालकावर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह उचलण्यात येणार नाहीत, असा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com