Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक
Online Betting: शिवा ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या सट्टेबाजी रॅकेटचा नागपुरात पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून मोठा डेटा आणि आर्थिक पुरावे जप्त केले आहेत.
नागपूर : शिवा ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या ऑनलाइन सट्टेबाजीचे मोठे रॅकेट नागपुरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी छत्तीसगडमधील खैरागड पोलिसांनी शुक्रवारी (ता.११) छापा टाकून आरोपींना नागपुरातून अटक केली.