सिहोरा : गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी २०२२-२३ च्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची केवायसी पूर्ण केली आहे. केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भेदभावपूर्ण पद्धतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसाभरपाईची रक्कम जमा कण्यात आली आहे. तरी, बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयात फेऱ्या वाढलेल्या आहेत.