
सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी मातृतीर्थमध्ये केले. राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांना अभिवादन करून नतमस्तक झाल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे शहरात आगमन झाले. राष्ट्रवादी पक्ष, महायुती शहरातील नागरिक व प्रशासनाच्या वतीने त्यांचे राजवाडा येथे स्वागत करण्यात आले.