Washim Crime: आमखेड्यात समाजातील वादातून युवकाचा खून; चार गंभीर जखमी विनाक्रमांकाच्या दुचाकी सोडून हल्लेखोर फरार
Brutal Knife Attack: मालेगाव तालुक्यातील आमखेडा गावात घरगुती वादातून चाकूहल्ला झाला असून अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मालेगांव : दिवाळीचा दुसरा दिवस, पाडवा आमखेड्यासाठी रक्तरंजित दिवस निघाला असून तालुक्यातील जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमखेडा या गावात घरगुती नातेसंबंधांवरून झालेल्या आपसी वादातून चाकूहल्ला करण्यात आला.