Washim News: मुलीच्या लग्नापूर्वीच पित्याचा शेवट! अमानी येथील युवा शेतकऱ्याने विष घेऊन संपवले जीवन
Washim Farmer: मालेगाव तालुक्यातील शेतकरी मदन खडसेने आर्थिक तणाव आणि कर्जबाजरीपणामुळे विष प्राशन करून जीवन संपवले . त्यांच्या पश्चात दिव्यांग वडील, वृद्ध आई, पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहेत.
मालेगाव : तालुक्यातील अमानी येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज (ता. ९ मार्च) रोजी सकाळी उघडकीस आली.