

Vidarbha News
esakal
मलकापूर: विदर्भाचे प्रवेशद्वार आणि तालुक्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या मलकापूरला प्रशासकीयदृष्ट्या मोठी बळकटी लाभली आहे. तरी प्रत्यक्ष विकासाच्या बाबतीत शहर आजही मागे असल्याचे दिसून येते.
नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय यांसह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये येथे आहेत. शहर, ग्रामीण आणि एमआयडीसी अशी तीन पोलिस ठाणी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३, राज्यमार्ग आणि रेल्वे सुविधा यामुळे मलकापूरचे भौगोलिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.