Gondia Accused Arrested in Anmol Killed case
sakal
गोंदिया - फुलचूर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. बहिणीला सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाचा बदला घेण्यासाठी साळ्याने ५० हजार रुपयांची सुपारी देऊन तीन मित्रांच्या मदतीने अनमोल वसंत रंगारी (वय-४०, रा. कारंजा) याचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.