esakal | मोबाईल चॅट डिलीट करून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या; अमरावतीमधील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

Man in Amravati end his life by deleting his chats

आत्महत्या करणारा अमरावतीचा युवक बाहेर राज्यातील एका आयआयटी कॉलेजमध्ये बीई अंतिम वर्षाला शिकत होता. लॉकडाउनमुळे तो अमरावतीमध्ये घरीच होता. त्याची एका मुलीसोबत फ्रेण्डशीप सुरू होती.

मोबाईल चॅट डिलीट करून विद्यार्थ्यानं केली आत्महत्या; अमरावतीमधील घटना 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती ः गाडगेनगरहद्दीत राहणाऱ्या व अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या युवकाने मोबाईलवर केलेले चॅट डिलीट करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी वरोरा येथील युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

आत्महत्या करणारा अमरावतीचा युवक बाहेर राज्यातील एका आयआयटी कॉलेजमध्ये बीई अंतिम वर्षाला शिकत होता. लॉकडाउनमुळे तो अमरावतीमध्ये घरीच होता. त्याची एका मुलीसोबत फ्रेण्डशीप सुरू होती. त्या युवतीची आधी वरोरा येथील युवकासोबत मैत्री होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. त्यावरून आत्महत्या करण्यापूर्वी अमरावती व वरोरा येथील युवक या दोघांमध्ये वाद सुरू होता. असे गाडगेनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. 

अधिक वाचा - दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांची टीका

आत्महत्येपूर्वी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने वरोरा येथील युवकाची समजूतदेखील काढली होती. त्यांच्यातील वाद वाढत गेला. त्यातून वरोऱ्याच्या युवकाने अमरावतीच्या युवकास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिल्याचा आरोप आहे.

वरोरा येथील युवकाच्या भीतीमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, असा आरोप आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या पालकांनी तक्रारीत केला. त्याआधारे पोलिसांनी वरोरा येथील युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे बयाण नोंदविले. आत्महत्येपूर्वी जे मोबाईल चॅट विद्यार्थ्याने डिलिट केले ते नेमके कशाप्रकारे होते, याची माहिती पोलिस घेत आहेत.
-मनीष ठाकरे, 
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ